शेतात घास कापत बसलेल्या विवाहितेला त्याने अचानक पकडले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- देशात महिलांवरही अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच जिल्ह्यात देखील दरदिवशी स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहे.

राहूरी तालुक्यातील घोरपडवाडी परिसरात राहणारी २१ वर्षाची विवाहित तरूणी तिच्या शेतात घास कापत असतांना आरोपीने पाठीमागून येवून तिला धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला.

इतर आरोपींनी शेतात घुसून त्यांच्या विरुद्ध असलेला दिवानी दावा कोर्टात दाखल केला तो काढून घे नाहीतर तुला कुऱ्हाडीने ठार मारू, अशी धमकी दिली.

काल 10 वा घोरपडवाडी शिवारात पीडित तरूणीच्या शेतात हा विनयमंग व धमकीचा प्रकार घडला. पीडित तरूणीने फिर्याद दिल्यावरून आरोपी सर्जेराव कुशीनाथ जाधव, नानासाहेब कुशींनाथ जाधव,

नितीन सर्जेराव जाधव, उत्तम नाना जाधव, सर्व रा. घोरपडवाडी, ता. राहुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी थेट दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास जायभाय हे करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment