या जिल्हा परिषद ऊर्दू शाळेत चोरी एलसीडी,टीव्हीसंचासह दीड लाखाचा ऐवज लंपास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील एलईडी टीव्ही संच व कॉम्प्युटर मॉनिटर, माईक इत्यादी वस्तूंसह अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार दि.२०ऑक्टेाबर रोजी घडली.

याबाबत माहिती मिळताच नूतन डीवायएसपी आप्पासाहेब जाधव यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करून अटक करण्याचे आदेश दिले. याबाबत माहिती अशी की, आमदार रोहित पवार यांनी एक वर्षापूर्वी तालुक्यातील सर्व शाळेतील मुलांना अत्याधुनिक शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू करून

मुले व मुलींच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम त्यांनी हाती घेतले. यामध्ये सारे शिकूया, पुढे जाऊया,, नवा मार्ग, नवी दिशा, नव्या पिढीची आमची शाळा, हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी तालुक्यातील सर्व शाळांना एलसीडी टीव्ही संच देऊन सर्व प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचा संकल्प केला होता.

त्यादृष्टीने त्यांनी प्रशिक्षण देऊन हे काम सुरू केले होते परंतु कोरोनाच्या काळात सर्व शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन खर्डा येथील उर्दू शाळेतील टीव्ही, संगणक, व इतर साहित्य चोरांनी चोरून नेले आहे. यासंदर्भात डिवायएसपी आप्पासाहेब जाधव हे खर्डा दूर क्षेत्रास भेट देण्यासाठी आले होते.

त्यांच्या निदर्शनास पत्रकार संघाचे दत्तराज पवार, संतोष थोरात, अनिल धोत्रे, गणेश जवेरी यांनी ही शाळेची चोरीची बाब आणून दिली. त्यांनी लगेच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सर्व माहिती घेऊन जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना योग्य तो तपास करून लवकरात लवकर चोरांना अटक करण्याचे आदेश दिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment