‘यावर्षी आम्ही काळी दिवाळी साजरी करू’… या व्यवसायिकांनी घेतला आक्रमक पवित्रा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे जगावर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांच्या हातचा रोजगार गेला. उद्योग धंदे मोडकळीस आले. व्यवसाय क्षेत्र डबघाईला येऊ लागले.

अशा आर्थिक संकटातून सर्वजण हळूहळू बाहेर येऊ लागले आहे. यातच लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत सर्वक्षेत्र पुन्हा पूर्वपदावर येत आहे.

मात्र यातच शासनाच्या जाचक अटींमुळे त्रासलेले मंगलकार्यालय मालक, लॉन्स मालक यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कोरोना महामारीमध्ये लॉन्स आणि मंगल कार्यालयासाठी अनेक निर्बंध असल्याने मंगल कार्यालय आणि लॉन्स चालकांसह यावर अवलंबून असणार्‍या चोवीस पूरक घटकांतील व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अजूनही सरकारने मंगल कार्यालय अथवा लॉन्समध्ये इतर राज्यांसारखी समारंभासाठी परवानगी दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत ठरलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभारत यावर्षी आम्ही काळी दिवाळी साजरी करू असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय आणि लॉन्स चालक यांसह चोवीस पूरक घटकांची बैठक आज (मंगळवार ता.20) संगमनेर शहराजवळी वसंत लॉन्स येथे पार पडली.

या बैठकीस असोसिएशनचे राज्याध्यक्ष गोरख कुटे, सचिव रोहिदास धुमाळ, संगमनेर संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय मैड, सचिव अनिल राऊत, उपाध्यक्ष रामनाथ कुर्‍हे, मंडप डेकोरेशनचे अध्यक्ष महेश जोंधळे,

प्रशांत चांदेकर, अनिल चौधरी, खंडू बाणाईत, शिवानी जाधव आदी असोसिएशनचे राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. बसमध्ये 50 प्रवाशांना बसण्याची परवागनी राज्य सरकार देते.

मग मंगल कार्यालयाला का नाही असा सवाल उपस्थितांनी केला. आम्हाला परवागी द्या आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊ असे यावेळी मंगल कार्यालय मालक म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment