जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्या विरोधात महिलेची तक्रार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- जातीवाचक शिवीगाळ व हीनतेची वागणूक दिल्याबद्दल अलका बोर्डे या महिलेने शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन पोलीस अधिक्षक कार्यालयात तक्रार केली आहे.

तर सदर कार्यकर्त्यावर ऑनलाईन तक्रार देखील नोंदविण्यात आली आहे. बोर्डे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हंटले आहे की, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख आनंद लहामगे

यांनी शिवसेने पक्षात काम करा असे सांगत पक्षाच्या बैठकिसाठी रविवार दि.18 ऑक्टोबर रोजी पाईपलाइन रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालय येथे बोलवले होते.

त्या ठिकाणी गेले असता लहामगे यांनी माझी ओळख करुन दिली. या बैठकिला उपस्थित असलेले शिवसेनेचे युवा कार्यकर्ते रवी वाकळे याने मला शिवसेना पक्षात काम करण्यास विरोध करुन जीतीवाचक शिवीगाळ केली.

तसेच हीनतेची वागणूक देऊन सर्वांसमोर अपमानित केले. जातीवर वाईट बोलण्यास विरोध केला असता त्याने शिवीगाळ केली. इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता

त्याने अंगावर धाऊन खुर्ची फेकून मारल्याचे तक्रार अर्जात म्हंटले आहे. तर जातीवाचक शिवीगाळ करुन हीनतेची वागणूक देणार्‍या सदर शिवसेनेचे युवा कार्यकर्ते रवी वाकळे यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी बोर्डे या महिलेने केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment