नौकरीच्या आमिष दाखवत 57 लाखांना फसवले… या ठिकाणी घडली घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना महामारीमुळे अनेक जणांच्या हातचा रोजगार गेला आहे. तसेच यापूर्वीही अनेकजण बेरोजगार असल्याने नौकरीची शोधाशोध करत असतात.

मात्र अशाच संधीचा फायदा घेत काही भामटे नौकरीच्या आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालतात. असाच काहीसा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे.

तहसीलदार असल्याची बतावणी करीत येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिरातील हंगामी शिक्षिका असलेल्या एका महिलेसह सात जणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुमारे सत्तावन्न (57) लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात घडला आहे.

याबाबत धिरज प्रताप पाटील (रा.साकुरी, ता.राहाता) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत फिर्यादीने म्हंटले आहे की,

बिना दिनेश सोनावणे रयत शिक्षण संस्थेच्या राहाता येथील शारदा विद्या मंदिरात हंगामी शिक्षिका होत्या. त्यांनी मी व माझी पत्नी विद्या यांना रयतमध्ये शिक्षक सेवक पदाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

त्यानंतर ही महिला व तिचा पती दिनेश हे आम्हांला लोणी येथील एका रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचार्‍याकडे घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर या कामासाठी वीस लाख रुपये द्यायचे असे ठरले.

सोनावणे दाम्पत्याकडे आम्ही 20 लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर सोनावणे राहाता येथून आपले बिर्‍हाड घेऊन फरार झाले आहे.

दरम्यान या तक्रारीची दखल घेत राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला माहिती पाठवली आहे.

तेथून आलेल्या सुचनेनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment