कृषिविद्यापीठातील लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- आपले प्रलंबित कामे करून घेण्यासाठी लाच देण्याचे प्रकार सध्या जोरात सुरु आहे. मात्र अशा लाचखोरांविरुद्ध आता सर्वसामान्य देखील आक्रमक पवित्रा घेत आहे.

यामुळे जिल्ह्यातील एका शिक्षणाच्या मंदिरात लाचखोरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे पेन्शनबाबतचे कागदपत्र तयार करून देऊन पेन्शनचा लाभ मिळवून देण्यासाठी

५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

राहूरी येथील 61 वर्षीय तक्रार दराने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे म.फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील रामेश्वर काशिनाथ बाचकर, वय 50 वर्ष, वरिष्ठ लिपिक,

वर्ग- 3,पदव्युत्तर महाविद्यालय याने सेवानिवृत्तीचे संदर्भातील कागदपत्रे लवकरात लवकर तयार करून त्यांची पेन्शन वेळेत मिळावी याकरिता पाच हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग अहमदनगर यांच्याकडे केली होती.

त्यानुसार सापळा लावून आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी आरोपी रामेश्वर बाचकर यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment