फसवणुकीचा नवा फंडा ; मेसेजद्वारे केले जातेय ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  सध्याच्या टेक्निकल जमान्यात फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. फोन करून एटीएम नंबर विचारून फसवणूक केली जाते.

आता फसविण्याचा नवीन फंडा समोर आला आहे. आता मेसेजद्वारे वेगवेगळे प्रलोभने दाखवून लिंक डाउनलोड करण्यास सांगून लुबाडले जात आहे. सध्या लोकांना ‘तुमच्या खात्यावर पेटीएमद्वारे पैसे पाठविले आहेत.

ते मिळवण्यासाठी सोबतची लिंक डाऊनलोड करून घ्या आणि पैसे मिळवा’, असे मेसेज करून फसवणूक करण्यात येत आहेत. यासंदर्भात नगर सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीच्या तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत.

वेगवेगळी आमिष दाखविणारे लिंक ओपन करणे धोक्याचे बनले आहे. पेटीएमवरून तुमच्या खात्यावर थेट पैसेच जमा केल्याचे मेसेज येतो.

ज्यांना या मेसेजबद्दल माहिती नाही अशा व्यक्तीकडून लिंक डाऊनलोड करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ज्या नंबरवरून हे मेसेज येतात त्यावर कॉल केल्यास हे फोन लागत नाहीत.

पेएटीमकडून आपल्याला पैसे आले असा समज लोकांचा होतो. पेटीएमवरून पैसे जमा झाल्यास खातेदाराच्या ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा होते, त्या बँकेकडून तातडीने आपल्याला मेसेज येतो.

पेटीएमवरून कुणी पैसे पाठविले तर ते थेट खात्यावर जमा होतात. त्यासाठी कोणतेही लिंक डाऊनलोड करावी लागत नाही. आर्थिक व्यवहार किंवा सोशल मिडियाबद्दल जागरूक असलेल्या व्यक्तीला हे समजू शकते.

परंतू त्याबद्दल याबाबतचे ज्ञान नसेल आणि पैसे मिळाल्याचा मेसेज आल्यावर उत्सुकतेपोटी पैसे मिळवण्यासाठी संबंधीत लिंक ओपन केल्यास त्यांना आर्थिक फटका बसत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment