अहमदनगर ब्रेकिंग : मायलेकींचा विहरीत पडून दुर्देवी मृत्यु   

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडे गावातील मायलेकींचा विहरीत पडून दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना सकाळी घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंगुसवाडे येथील सुनिता नारायण हिंगे (वय ४२) व मुलगी प्रतिक्षा नारायण हिंगे (वय १४) या मायलेकी सकाळी आठ वाजता शेतात कापुस वेचणीसाठी गेल्या होत्या. मुलगी प्रतिक्षा हिंगे ही शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता परत आली नाही.

बराच वेळ होऊनही मुलगी परत न आल्याने आई विहीरीकडे गेली पाण्यात मुलीचा शोध घेण्यासाठी विहीरात डोकावलं असता पाय घसरुन आईचाही विहिरीत पडुन अंत झाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment