पुण्यातील कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करणार्‍या अंजुम इनामदार यांचा अहमदनगर मध्ये सत्कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- कोरोना काळात जेव्हा सर्वांना आपली जीवाची रक्षा कशी करावी याकळे लक्ष होते. नागरिक लॉक डाऊन आल्याने घराबाहेर पडत नव्हते. एखाद्याला कोरोना झाला तर त्याचे व त्याच्या कुटुंबाकडे जाण्यास लोक घाबरायचे.

कोरोनाने मृत्यु झालेले व्यक्तीचा अंत्यविधी कसा आणि कोण करणार याची चिंता नातेवाईकांमध्ये असायची, तेव्हा सामान्य जनतेचा विचार करून पुण्यात मूलनिवासी मुस्लिम मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार व त्यांचे सहकारी घराबाहेर पडले आणी कोरोनाने मृत्यु झालेल्या नागरिकांची अंतिम विधीची जबाबदारी घेतली.

मृत्यु कोणतेही जाती धर्माचे व्यक्तीचा असो अंजुम भाई आणि त्यांचे सहकारी तयार असायचे. मयत व्यक्तीची अंत्यविधी त्याच्या धर्माप्रमाणे व्यवस्थित पार पाडून त्यांच्या नातेवाईकांना त्याची सविस्तर माहिती देत असे. साधारण 600 पेक्षा जास्त विविध धर्माच्या लोकांची विधी अंजुमभाई आणि त्यांचे सहकारी यांनी पार पाडले.

हे सर्व काम अंजुमभाई यांनी निःशुल्क केले. यामुळे पुण्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला व समाधान वाटले की आपले नातेवाईकांची विधी योग्य रिती पर पडली. अंजुम इनामदार हे अहमदनगर येथे काही काम निमित्त आले असता एमआयएम अहमदनगरतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी एमआयएम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महा सचिव जावेद शेख, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शाहनवाज तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज शेख, निसार शेख, राजेश्‍वर श्रीराम आदी उपस्थित होते. यावेळी अंजुम इनामदार यांनी आपला अनुभव मांडतांना ते म्हणाले,

जेव्हा मी आणी माझे सहकारी या कामासाठी तयार झालो तेव्हा आम्ही प्रशासनाला भेटून त्यांना याची कल्पना दिली. जेव्हा कोणाचा मृत्यू झाला की आम्हाला रुग्णालयातून किंवा रुग्णाचे नातेवाईकांचा कॉल यायचा, आणि लगेच आम्ही एकमेकांना संपर्क करून तयारीला लागायचो दिवस असो की रात्र.

पहिले अंत्यविधीचा काम पूर्ण करून मृतच्या नातेवाईकाला कल्पना द्यायचो. हे काम अल्लाह-परमेश्‍वरांनी आमच्या हाती हे काम करुन घेतले याचे आम्हा सर्वांना खूप समाधान आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment