महसूल मंत्र्यांच्या शहरात भिक्षेकऱ्यांचे होतायेत मृत्यू… तर्कवितर्कांना उधाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारे संगमनेर बसस्थानक आपल्या भव्यदिव्य आणि देखण्या रचनेमुळे निश्चितच चर्चेचे स्थान बनले आहे.

मात्र आता महसूल मंत्र्यांच्या याच शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या संगमनेर बसस्थानकात गेल्या काही दिवसांपासून भिक्षेकर्‍यांचे जीव जाऊ लागले आहेत.

अलिकडच्या काळात आत्तापर्यंत या परिसरात तब्बल चौघांनी जीव त्यागल्याने अनेक भिक्षेकर्‍यांना हक्काचा आश्रय देणार्‍या या स्थानकाबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

उद्योग-व्यवसाय यामुळे जिल्ह्यातील आघाडीचे शहर म्हणून उल्लेख असलेल्या संगमनेरमध्ये अशा घडू लागल्याने तर्क वितर्क लावले जात आहे.

‘लॉकडाऊन’च्या कालावधीत संगमनेर बसस्थानकाच्या परिसरात तात्पूरता आश्रय घेणार्‍या अनेकांनी दोनवेळेचे जागीच मिळत असल्याने येथेच मुक्काम ठोकला आहे.

यातील गरजू, दिव्यांग व निराधारांचे ठिक आहे, पण त्यांच्या आडून काही धडधाकटांचीही गर्दी असल्याने त्यांची चौकशी होवून त्यांना पुढील दिशा दाखवण्याची गरज आहे.

या गर्दीत काही अपप्रवृत्तीचाही शिरकाव असल्याने रात्रीच्यावेळी या गर्दीतून गैरप्रकारही घडत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी वेळीच या गोष्टीकडे लक्ष देवून पुढील अनर्थ टाळला पाहिजे.

अन्यथा वैभवशाली ठरलेली ही इमारत गुंडगिरी आणि अवैध व्यवसायाचा अड्डा बनण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment