तहसीलदारांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक झाले परेशान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  म्हणायला सरकारी अधिकारी जनतेचे सेवेसाठी असतात. मात्र सरकारी बाबू म्हणजे स्वतःच्या मनाचा कारभार चालवणारे हि आजच्या काळात त्यांची झालेली खरी ओळख म्हणावे लागेल.

आओ – जाओ घर तुम्हारा…कधीही या कधीची जा त्यांना विचारणारेच कोण नसतात. व जनतेला उत्तरे देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. अशाच एका सरकारी अधिकाऱ्यांमुळे श्रीगोंदा येथील नागरिक चांगलेच परेशान झाले आहे.

श्रीगोंदा तहसिल कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या अभिलेख कक्षात गेली अनेक दिवसांपासून जुने दस्तऐवज मिळण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असून श्रीगोंदा तहसिलदार प्रदीपकुमार पवार यांनी तब्बल आठ दिवस कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचा आदेश पारित केला आहे.

यामुळे सर्वसामान्य जनतेच्या अडचणीमध्ये अजूनच वाढ झाली आहे. त्यामुळे श्रीगोंदा तहसिलदार यांच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

सध्या विविध प्रकारची कर्ज वाटप योजना सुरु असून या सर्व योजनासाठी सर्वसामान्य व्यक्ती तहसिल कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे.

मात्र आपल्या मनाचे श्रीगोंदा तहसिलदार प्रदीपकुमार पवार यांनी मनमानी कारभार करत एक आदेश पारित केला आहे. त्या आदेशानुसार अजून आठ दिवस अभिलेख कक्षात कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या नक्कलाही उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून यास जबाबदार कोण? यामुळे नागरिकांच्या अडचणीमध्ये अजूनच जास्त प्रमाणात वाढ झाली आहे.

तरीही तहसिलदार हे लोकसेवक असल्याचा विसर त्यांना पडलेला दिसतोय अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून होताना दिसत आहे.

तरी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्त कार्यालय अशा अनेक ठिकाणी दाद मागणार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment