Ahmednagar NewsAhmednagar South

निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते…

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-राष्ट्रवादी काॅंग्रेसला ओहोटी लागली, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते.

वेलकम एकनाथ खडसे साहेब ! असे ट्विट करून आमदार रोहित पवार यांनी एकनाथ खडसे यांचे स्वागत केले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

आज हे जाहिर झाल्यानंतर जामखेड-कर्जत मतदारसंघातून आमदार रोहित पवार यांनी त्यांचे स्वागत केले, तर भाजपचे माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी खडसे यांना पश्चाताप होईल, अशी टीपन्नी केली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून खडसे भाजपमध्ये नाराज होते. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. आता प्रवेश निश्चित झाल्याने राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button