श्रीरामपूर जिल्हा निर्मितीचा लढा तीव्र करण्याच्या हालचाली सुरू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपूरकरांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा लावून धरला असून श्रीराममपूर जिल्हा निर्मितीचा लढा तीव्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून येत्या प्रजासत्ताक दिनापासून आंदोलन तीव्र करणार येणार आहे.

श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी नुकतीच बैठक झाली. या वेळी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रताप भोसले यांनी थेट अमेरिकेतून अध्यक्षीय मार्गदर्शन केले.

यावेळी समितीचे अध्यक्ष बाबासाहेब औताडे, सुनंदा आदिक, सुरेश ताके, शरद डोळसे, मिलिंद साळवे, तिलक डुंगरवाल आदी उपस्थित होते.

यावेळी कोरोनाचे संकट गेल्यावर श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या चळवळीला नव्याने चालना देण्यात येणार आहे. जिल्हा विभाजन,

नवीन जिल्हा निर्मितीबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर झाला.

त्याचा मंत्रालयीन पातळीवर श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने पाठपुरावा करावा, अशी सूचना मिलिंद साळवे यांनी केली. समितीच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या

राजकीय पोस्टवर नाराजी व्यक्त करीत यापुढे अशा पोस्टस् टाळून सदस्यांनी समितीच्या मंचावर जिल्हा निर्मिती कार्याच्या दृष्टीने चर्चा होण्याची अपेक्षा प्रताप भोसले यांनी व्यक्त केली.

लवकरच समितीची पुढील बैठक होणार आहे. आमदार लहू कानडे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह नगरसेवक सहभागी होणार आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment