दिखाव्यासाठी केली पोलिसांनी कामगिरी… मोठे सूत्रधार मात्र निर्धास्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु आहे. या घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी देखील कारवायांना सुरुवात केल्या आहेत. मात्र पोलिसांच्या या कारवाया सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे.

गुटखा कारवाई नंतर आता जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पोलिसांची एक कारवाई सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे मोठया प्रमाणात दारूचा अवैध व्यवसाय सुरू असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत होती.

वारंवार मागणीनंतर अळकुटी बिटच्या पोलिसांनी कारवाई करीत किरकोळ व्यवसायीकांवर कारवाई केली. बडे मासे मात्र कारवाईतून अश्‍चर्यकारकरीत्या बचावले आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी कि, अळकुटी शिवारात बेल्हे रस्त्यावर कालीका हॉटेल येथे अळकुटी बिटच्या पोलिसांनी छापा टाकून

राहुल बबन शिरोळे याच्याकडून देशी संत्रा कंपनीच्या १ हजार ३०० रूपयांच्या २५ बाटल्या जप्त केल्या. शिरापूर येथील मच्छिंद्र उर्फ बापू लक्ष्मण साळवे यांच्या घराच्या आडोशाला अडीच हजार रूपये किमतीची गावठी हातभटटीची दारू आढळून आली. पोलिस पथकाने ती जप्त केली मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.

तसेच रेनवडी येथे बाळासाहेब कोंडीबा शितोळे याच्याकडे सुमारे आठ हजारांचा माल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे या छाप्यातही आरोपी शितोळे यास पोलिस ताब्यात घेउ शकले नाहीत.

छाप्यात नमुद करण्यात आलेली दारू बाटल्यांची संख्या तसेच आरोपी पसार झाल्याचे नमुद करण्यात आल्याने ही कारवाई केवळ देखाव्यापुरतीच असल्याचे उघड झाले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment