खुलेआम गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात सध्या सुरु असलेली गुटखा कारवाई चांगलीच चर्चेत आहे. यामुळे अनेक अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यातच आता खुलेआम बेसुमार गुटखा विक्री करणाऱ्या व्यपार्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

या कारवाईबाबत भीमशक्ती संघटना व दलित अल्पसंख्याक सुरक्षा महासंघाच्यावतीने आज राहुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, राज्यात गुटखा बंदी असताना राहूरी फॅक्टरी येथील एक किराणा दुकानदार हा खुलेआम बेसुमार गुटखा विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अशा या व्यापाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच अण्णा भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जर दोन्ही व्यापाऱ्यांवर ४८ तासात फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही तर उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडू असा इशारा दलित अल्पसंख्याक सुरक्षा महासंघाचे तालुकाध्यक्ष विक्रांत पंडित, भीमशक्ती संघटनेचे राहूरी फॅक्टरी शहर अध्यक्ष मयूर कदम व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment