के.के.रेंज प्रश्‍नी आदिवासी समाजाने मानले आ.निलेश लंके यांचे आभार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-के.के. रेंजसाठी भूसंपादन केले जाणार होते, यासर्व घडामोडींमध्ये सर्वात महत्वाचे आदिवासी समाजामध्ये फार भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

कारण या भागांमध्ये मोठया प्रमाणात आदिवासी समाजाची संख्या असून बरेच्या लोकांचे उपजीविकेचे साधन शेती हे आहे. या भागातील आदिवासी समाज हा शेती आणि आपल्या पारंपारिक व्यवसायामुळे उपजीविकेचे साधनतून मिळेल त्या परिस्थितीमध्ये राहणारा समाज आहे.

अशा परिस्थितीमध्ये भूसंपादन होणार या भीतीमुळे अनेकांना पुढे भविष्यातील प्रश्‍न निर्माण झाले होते. परंतु गेल्या अनेक दिवसापासून आ. निलेश लंके यांनी खा. शरद पवार यांच्या माध्यमातून हा प्रश्‍न संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मांडला आणि यामध्ये सकारात्मक अशा पद्धतीने घडामोडी घडल्या व भूसंपादन होणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

ही बाब पारनेर, राहुरी मध्ये राहत असणार्‍या आदिवासी बांधवांना समजतात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आ. निलेश लंके यांचे समाजाप्रती असणारे प्रेम या वेळेत दिसून आले. या प्रसंगी आदिवासी समाजातील युवकांनी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शिंदे यांच्या पुढाकारातून आ. निलेश लंके भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

याप्रसंगी शिक्षक नेते चंद्रकांत चौगुले, मंगेश शिंदे प्रसाद शिंदे, सामाजिक कार्येकर्ते चंद्रभान ठुबे, गणेश खोकले, लंके साहेबांचे स्वीय सहाय्यक प्रा रामदास आडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भविष्यात पारनेर तालुक्यातील आदिवासी तरुण तरुणी, विद्यार्थी बांधवांसाठी विविध योजना राबवण्यासाठी प्रयत्न व्हावे या विषयी आ.लंके यांशी चर्चा केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment