प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या नावाखाली त्या भामट्याने पाच कोटींना गंडा घातला

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  लॉकडाऊनमध्ये जपून ठेवलेला पैसा जास्तीच्या हव्यासापोटी घालवून बसल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. या फसवणुकीमध्ये संबंधित भामट्याने व्यापाऱ्यांना चक्क पाच कोटींचा गंडा घातला आहे.

या घटनेमुळे शहरात एकच चर्चा रंगल्या आहेत. शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचे नाव सांगून एकाने शहरातील अनेक व्यापारी, उद्योजकांना सुमारे पाच कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

Advertisement

सध्या हा आरोपी फरार आहे. त्यामुळे गुंतवणूक केलेल्या व्यापाऱ्यांवर डोक्‍याला हात लावण्याची वेळ आली आहे. या व्यवहाराचा कोणताही पुरावा नसल्याने सर्वच हतबल झाले आहेत.

याबाबात अधिक माहिती अशी कि, गेल्या काही दिवसांपासून शहरातील डाळ मंडई येथे मैदा, बेसन, यांसह विविध किराणा मालाच्या खरेदीसाठी एक जण व्यापाऱ्यांकडून पैसे घेत होता.

Advertisement

या घेतलेल्या पैशांवर टक्केवारीनुसार महिन्याला व्याज देत असे. त्यामुळे अनेकांनी त्याच्याकडे गुंतवूणक केली. ही गुंतवणूक तो डाळ मंडईतील एका व्यापाऱ्याच्या नावाखाली करीत होता.

शहरातील अनेक उद्योजक व व्यापाऱ्यांकडून त्याने पैसे घेतले. सुरवातीला त्यांना टक्केवारीनुसार परत केले. मात्र, हा सर्व व्यवहार वरवर होत होता. त्याचा कुठलाही पुरावा नव्हता.

Advertisement

शहरातील सुमारे 20 ते 25 व्यापाऱ्यांकडून तब्बल पाच कोटी रुपये घेऊन 15 दिवसांपूर्वी आरोपी फरार झाला. व्यापारी त्याचा शोध घेत असले,

तरी कोणताही पुरावा मागे नसल्याने सारेच हतबल झाले आहेत. याबाबत अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement