ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट भरपाई द्यावी

Published on -

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- यावर्षीच्या अतिवृष्टीने शेतकरी वर्ग हैराण झालेला असतानाच थोडी फार वाचलेली पिके परतीच्या पावसाच्या तडाख्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर न भूतो न भविष्यती असे संकट उभे राहिले.

सरकारने आता पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन पाठवून केली.

मागील वर्षीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना गारपीटीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुष्काळ, अनेक ठिकाणी आलेले महापूर, त्यानंतर पुन्हा अवकाळी, त्यातच रोगराई अशा एक ना अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले.

त्यातून सावरत असताना आणि यावर्षी चांगल्या पीक पाण्याची अपेक्षा असताना सततच्या पावसाने फुलोऱ्यात आलेले सोयाबीन, कापूस, बाजरी, उडीद, मूग, तूर, कांदा, बटाटा, भात, ऊस या पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले.

सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशीही मागणी परजणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. निवेदनाच्या प्रती उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!