….बडा पछताओगे; खडसेंच्या राजीनाम्यानंतर माजी पालकमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाचा राजीनामा दिला आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा देखील केली आहे. दरम्यान खडसेंच्या राजीनाम्यांनंतर आता राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

काहींनी खडसेंच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे तर काहींनी खडसेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यातच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी खडसेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीचे असताना त्यांना जी किंमत पक्षात मिळाली ती किंमत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिळणारं नाही.’ अशी प्रतिक्रिया माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले कि, खडसे हे भाजपात असताना त्यांना जी किंमत मिळाली ती त्यांना राष्ट्रवादीत मिळणारं नाही. तसेच त्यांच्याबरोबर जे जात आहे

अशी जी वल्गना केली जात आहे ती चुकीची असून मला वाटतं नाही की भाजपचा कोणताही माणूस राष्ट्रवादीत प्रवेश करतील. कारणं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा विस्तार होतं आहे.’ असं राम शिंदे म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment