Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर दोघां नराधमांकडून बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर शहरातील वार्ड नं. १, गोंधवणी रोड, लक्ष्मीनारायणनगर परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या तरुणीला नोकरी लावून देतो म्हणून पुण्यात बोलावुन दोघांनी तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.

या अत्याचाराचे मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग केले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी पुण्यातील लॉजमध्ये व पुण्यातील आरोपीच्या घरात इच्छेविरुद्ध बलात्कार करण्यात आला, शूटिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणींकडून तब्बल ६१ लाख ४४ हजार ६०० रुपये रक्कम घेवून फसवणुक केली.

ही घटना उघड झाल्याने नोकरीसाठी तरुणींना किती भयंकर अत्याचार, अन्यायाला सामोरे जावे लागते हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. श्रीरामपूर परिसरातील प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या कुटुंबातील या ३० वर्षाच्या तरुणीला आरोपी प्रसाद अनिल महामिने याने तरुणीच्या ओळखीचा फायदा घेवून तिला ऑगस्ट २०१८ मध्ये पुणे येथे नोकरी लावून देतोअसे म्हणुन तिला पुणे येथे बोलावुन घेतले.

तिला कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन लॉजवर नेवून तिच्यावर बलात्कार करून त्याची व्हिडीओ शुटींग काढून ती व्हायरल करण्याची धमकी आरोपी प्रसाद महामिने याने पीडित तरुणीला दिली व तिला वेळोवेळी पुणे येथे बोलावून तिच्यावर लॉजवर तसेच आरोपी पुजा विशाल ढोले,विशाल विठठल ढोले यांच्या घरात तिच्यावर वारंवार बलात्कार करुन

तिला धमकावून वेळोवेळी तिच्याकडून ६१ लाख ४४ हजार ६०० रुपये घेवून तसेच पिडीत तरुणीवर तिच्या इच्छे-विरुद्ध बलात्कार करुन त्याचे व्हिडीओ शुटींग काढून ती व्हायरल करण्याची धमकी देवून पिडीत तरुणीकडून संगनमत करुन वारंवार पैसे घेवून अत्याचार करुन आर्थिक फसवणूक केली.

पिडीत ३० वर्षाच्या तरुणीने श्रीरामपूर शहर पोलिसात काल फिर्याद दिल्यावरुन आरोपी प्रसाद अनिल महामिने, विशाल विठ्ठल ढोले, पूजा विशाल ढोले रा. रूम नं. २०४, मेघा हाईट्स, शिंदे बिल्डिंगजवळ, रुपीनगर, मेकराई पेट्रोल पंपासमोर, हडपसर, पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button