यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने नगररचनाकार चारठाणकर यांच्या निलंबनाची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- महापालिकेतील नगर रचनाकार आर. एल. चारठाणकर यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन त्यांना निलंबित करण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

महिला ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील, भिंगार समन्वयक रोहिणी वाघीरे, विद्यार्थी समन्वयक मनिषा गायकवाड उपस्थित होत्या.

आर. एल. चारठाणकर महापालिकेत आल्यापासून प्रचंड भ्रष्टाचार सुरु झाला आहे. नगररचनाकार हे पद मनपामध्ये असताना त्यांची नेमणूक बेकायदेशीर झाली आहे. त्यांनी मोठे डेव्हलपर्स, बिल्डर्स यांच्याकडून जागेच्या मंजुरीसाठी लाखोच्या तडजोडी करीत आहे.

मंजूर केलेले अनेक ले आउट प्लॅनमध्ये सावळा गोंधळ असून, याची तपासणी केल्यास सर्व पितळ उघडे पडणार आहे. नगररचना विभागातील कनिष्ठ कर्मचारी, क्लार्क, शिपाई यांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत प्रकरणे तयार करून बेकायदेशीर मंजुर्‍या दिल्या जात आहे.

तडजोडीसाठी रात्री उशिरापर्यंत त्यांचे कार्यालय सुरु असते. नगररचना विभागासाठी आयुक्तांची दिशाभूल करून त्यांनी खास कर्मचार्‍यांच्या बदल्या करून घेतल्या व त्यांच्या मार्फत राजरोसपणे जनतेची लूट चालू आहे. चुकीच्या मार्गाने टीडीआर वाढवून बांधकाम क्षेत्राला बेकायदेशीरपणे मंजुरी दिलेल्या आहेत.

सीना नदीची पूर नियंत्रण रेषा निश्‍चित होऊनही त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर परवानग्या दिल्या जात आहे. नियमात पळवाट काढून या नगररचना विभागात मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. चारठाणकर यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून नगरमध्ये लेआउट मंजूर केले आहे.

तर ओपन स्पेस मध्यभागी ठेवण्यात आलेला नसून, प्रत्यक्षात जागेवर ओढे-नाले असताना ते गायब करून मंजुर्‍या देण्यात आल्या आहेत. कल्याण रोड वरील गणेश नगर पाण्याच्या टाकीजवळ एका जमिनीचे अनेक तुकडे करून लेआऊट मंजूर करून दिले, कुष्ठधाम रोडच्या पश्‍चिमेला असलेला मोठा नाला बुजविण्यात आला,

गुलमोहर रोड आनंद शाळे समोर नाला असतित्वात ठेवला नाही, केडगाव मराठानगर भाग्योदय मंगल कार्यालय जवळील जुन्या लेआउट मध्ये असलेला नाला गायब करण्यात आला, वडगाव गुप्ता रोड, गव्हाणे मळा येथील दोन लेआउट व औरंगाबाद रोड सावेडी येथील आनंद लॉन्स शेजारील लेआउटच्या मध्यवर्ती ओपन स्पेस न ठेवता मंजूरी देण्यात आली,

चारठाणकर यांनी मंजूर केलेले सर्व फाईलचे वाटप व कामकाजाचे वाटप संदर्भात स्वतंत्र अधिकारी नेमणूक करून चौकशी करण्याची तसेच त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. आठ दिवसात चारठाणकर यांच्यावर कारवाई न झाल्यास महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment