शहरात उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडचे अवैध अतिक्रमणे हटवावी : रामदास आंधळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  शहरामध्ये खासगी प्लॉटधारकांनी रस्त्याच्या कडेला मनपाची कुठलीही परवानगी न घेता पत्र्याच्या शेडची उभारणी केली आहे. यामधील गाळे व्यवसायासासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या आहेत.

तसेच काही नागरिकांनी मनपाच्या मोकळ्या जागेवर शेड उभारुन आपले व्यवसाय सुरु केले आहे. कुठलेही साईड मार्जिन न सोडता रस्त्याच्या कडेला शेड उभारल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकही रस्त्यावरच गाड्या पार्किग करतात.

शहरासह विशेषतः गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, तपोवनरोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ही शेडची अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे लवकरात लवकर काढावी किंवा यांच्याकडून व्यवसाय करापोटी तीनपट भाडे आकारावे. या कराराच्या माध्यमातून मनपाच्या उत्पन्नात वाढ होईल.

मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत. तसेच उपनगरामध्ये बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासारखा सुसज़़ दवाखाना उपनगरामध्ये म्हणजे पाईलरोड ते तपोवन रोडच्या दरम्यान उभारणे गरजेचे आहे. या भागामध्ये मोठी लोकवस्ती वाढली आहे.

तसेच या भागामध्ये कष्टकरी नागरिकही मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी या रुग्णालयाची गरज आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी फेज२ व अमृत पाणी योजनेचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे तसेच शहरातील अनाधिकृत नळ कनेक्शन धारकांवर कारवाई करावी,

अशी मागणी मनपाच्या वार्षिक अंदाज पत्रकाच्या सभेत महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे नगरसेवक रामदास आंधळे यांनी केली. पुढे बोलताना म्हणाले की, या पत्र्याच्या अनाधिकृत अतिक्रमाणाच्या शेडमुळे शहराच्या विद्रुपीकरणामध्ये दिवेसंदिवस मोठ्या प्रमाणात भर पडत आहे.

प्रशासनाचा कोणावरही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे कुठेही मनपाची परवानगी न घेता अतिक्रमणे करत आहेत. याचा खुलासा महापालिका प्रशासनाने करावा. यावेळी अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे यांनी या अतिक्रमणाबाबत अंदाज पत्रक सभेमध्ये सांगितले की,

नगर शहरामध्ये खासगी प्लॉट धारकांनी पत्र्याचे शेड उभारण्यात आलेले आहेत. त्यांनीही कुठलीही परवानगी घेतलेली नाही. त्या शेडधारकांना महापालिकेची कायदेशीर नोटीस पाठविण्यात आलेली आहे. लवकरच या शेडधराकांवर कारवाई करण्यात येईल. त्यांना शेड काढण्याचा अधिकार महापालिकेला आहे.

तात्पुरत्या स्वरुपात त्यांच्याकडून कर वसूल करायचा असेल तर आपल्याला करता येईल. तसेच जेव्हा ही शेड काढायचे असेल तेव्हा महापालिका काढू शकतात.

याचे सर्व अधिकार महापालिकेला आहेत. मनपाच्या वार्षिक अंदाज पत्रकाच्या सभेत महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे नगरसेवक रामदास आंधळे यांनी शहरातील अनाधिकृत अतिक्रमणे हटविण्याची मागणी करताना.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment