अल्पवयीन मुलीला फूस लावून नेणाऱ्याला तत्काळ अटक करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून नेणाऱ्याला तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी,

या मागणीसाठी तालुका पोलिस ठाण्यात ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन करत तपास न लागल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला.

१७ ऑक्टोबरला मुलीला घरातून पळवून नेण्यात आले. आरोपीचा शोध लागत नसल्याने मुलीच्या वडिलांसह काही ग्रामस्थांनी मंगळवारी तालुका पोलिस ठाणे गाठत ठिय्या मांडला.

यावेळी भाजपचे प्रकाश चित्ते, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सुनील मुथा, डॉ. वंदना मुरकुटे, शिवसेनेचे सचिन बडदे आदींनी पोलिस निरीक्षक

मसूद खान व उपअधीक्षक राहुल मदने यांच्याशी चर्चा करून लवकर तपास करावा, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. आरोपी विवाहित असून बेलापूरचा आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment