मोबाईल चोरणाऱ्या त्या भामट्यास पोलिसांनी केले गजाआड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  शहरात दरदिवशी चोरी, लुटमारी, अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढू लागल्या आहेत. यातच मोबाईल चोरणाऱ्या एका भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, फिर्यादी नंदकिशोर रोहीदास रा.खराडी शिवार ता.संगमनेर जि.अ.नगर यांनी फिर्याद दिली होती की, त्यांच्याजवळील मोबाईल आणि रोख रक्कम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.

सदर घटनेबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिलीप पवार स्थानिक गुन्हे शाखा,

अहमदनगर यांना गोपनीय बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील मोबाईल व रोख रक्कम चोरणारा आरोपी भानुदास लामखडे रा. देवगाव ता.संगमनेर येथील आहे.

पोलीस पथकाने तातडीने देवगाव येथे जाऊन आरोपी भानुदास भाऊ लामखडे वय- ६५ रा. देवगाव ता.संगमनेर यांस ताब्यात घेतले. या आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला.

सदर आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिले आहे.तरी पुढील तपास संगमनेर शहर पो.स्टे. करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment