थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविणार; शेतकऱ्यांना मिळणार लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- राज्य सरकारने 20 ऑक्टोबरला भूविकास बँकेच्या कर्जदार थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला आहे.

दिर्घ कालावधीपासून थकीत कर्ज विचारात घेता एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना लाभ घेता यावा, यासाठी या योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असणार्‍या शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील थकबाकी भरावी आणि 7/12 उतारा कोरा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी केले आहे.

जिल्हा भू विकास बँकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेसाठी 315 सभासद पात्र आहेत. त्यांच्याकडे प्रचलित नियमानूसार 6 कोटी 16 लाख रुपयांची थकबाकी आहे.

राज्य सरकारने बँकेच्या थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी एकरक्कमी कर्जफेड (ओटीएस) आणली आहे. या योजनेत शेतकर्‍यांना 3 कोटी 22 लाख रुपयांचे कर्ज भरावे लागणार असून 2 कोटी 94 लाख रुपयांची भरघोस सवलत मिळणार आहे.

ही एकरकमी कर्ज परतफेड योजना ही थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी शेवटची संधी म्हणून सरकार राबवित आहे. यामुळे शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment