मोदी सरकार ‘ह्या’ तारखेला लॉन्च करणार ‘किसान सूर्योदय योजना’; जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 ऑक्टोबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील तीन मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहे. गुजरातमधील शेतकऱ्यांसाठी ‘किसान सूर्योदय योजने’चे उद्घाटनही ते करणार आहेत.

अहमदाबादच्या पंतप्रधान सिव्हिल हॉस्पिटलमधील यू.एन. मेहता कार्डिओलॉजी अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरबरोबरच बालरोग रुग्णालय आणि टेली-कार्डिओलॉजी या मोबाइल अ‍ॅप्लिकेशन उद्घाटन करतील. याप्रसंगी ते गिरनार येथे रोप वे प्रकल्पाचे उद्घाटनही करणार आहेत.

काय आहे ‘किसान सूर्योदय योजना’:-  सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात गुजरात सरकारने नुकतीच किसान सूर्योदय योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पहाटे पाच ते रात्री नऊ या वेळेत वीज मिळू शकेल. 2023 पर्यंत या योजनेंतर्गत ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी राज्य सरकारने 3500 कोटी रुपयांचे बजेट दिले आहे. 2020-21 मध्ये दाहोद, पाटण, महिसागर, पंचमहाल, छोटा उडेपूर, खेडा, तापी, वलसाड, आनंद आणि गिर-सोमनाथ यांचा या योजनेत समावेश आहे. उर्वरित जिल्हे 2022-23 पर्यंत टप्प्याटप्प्याने समाविष्ट केले जातील.

गिरनार पहाड़ीवर रोपवे :- पंतप्रधानांद्वारे गिरनारमध्ये रोपवेचे उद्घाटन करण्यासोबत गुजरात पुन्हा एकदा जागतिक पर्यटन नकाशावर दिसेल. सुरुवातीला त्यामध्ये आठ लोकांना नेण्याची क्षमता असणारी 25-30 केबिन असतील. या रोपवेमध्ये केवळ 7.5 मिनिटांत 2.3 किलोमीटर अंतर कव्हर केले जाईल. या रोपवेवर प्रवास करताना गिरनार डोंगराभोवती पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळणार आहे.

टेली-कार्डियोलॉजीसाठी मोबाइल ऍप :- टेलि-कार्डियोलॉजीसाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशनची सुरुवात – पंतप्रधान यू.एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरशी संबंधित पेडियाट्रिक हार्ट हॉस्पिटलचे उद्घाटनही करतील आणि यासोबतच अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टेलि-कार्डिओलॉजीसाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशनची सुरुवात करतील.

यू.एन. मेहता संस्था ही जागतिक स्तरावरील वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय सुविधांनी युक्त अशी काही रूग्णालये आहेत. यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजीचा विस्तार 470 कोटी रुपये खर्च करुन केला जात आहे. विस्तार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर इथल्या बेडची संख्या 450 वरून 1251 पर्यंत वाढेल. ही संस्था ही देशातील सर्वात मोठी सुपर स्पेशियलिटी कार्डियाक शैक्षणिक संस्था होईल. जे जगातील सर्वात मोठ्या सुपर स्पेशालिटी कार्डियाक हॉस्पिटलपैकी एक असेल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment