धक्कादायक : तिच्या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून उकळले पैसे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-नोकरी लावून देतो, असे म्हणून तरूणीला पुण्यात बोलावून घेतले. काॅफीतून गुंगीचे औषध देऊन लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

त्याचे व्हिडीओ शुटींग करत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ६१ लाख ४४ हजार उकळल्याप्रकरणी महिलेसह दोन पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत श्रीरामपुरातील एका ३० वर्षीय तरुणीने प्रसाद अनिल महामिने, पूजा विशाल ढोले, विशाल विठ्ठल ढोले (सर्व रुम नंबर २०४, शिंदे बिल्डिंगजवळ, रुपीनगर, मेकराई पेट्रोलपंप, हडपसर, पुणे) यांच्याविरोधात २१ ऑक्टोबरला श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

त्यात म्हटले आहे, प्रसाद महामिने याने ओळखीचा फायदा घेत आॅगस्ट २०१८ मध्ये नोकरी लावून देतो, असे म्हणून पुण्याला बोलावून घेतले. काॅफीमध्ये गुंगीकारक औषध देऊन लाॅजवर नेऊन अत्याचार करून त्याची व्हिडीओ शुटींग काढून ती व्हायरल करण्याची धमकी दिली.

अशीच धमकी देत वेळोवेळी पुण्याला बोलावून लॉजवर, तसेच पूजा विशाल ढोले, विशाल विठ्ठल ढोले यांच्या घरात वारंवार बलात्कार केला. शिवाय आपल्याकडून वेळोवेळी धमकावून ६१ लाख ४४ हजार रुपये उकळले. या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment