अहमदनगर शिवसेनेतील वादावर अखेर पडदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  सभासद नोंदणी कार्यक्रमात खुर्च्यांची फेकाफेक होऊन आनंद लहामगे व रवी वाकळे यांच्यात वाद झाला होता. या वादावर भाऊ कोरगावकर व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने पडदा पडला.

हाॅटेल यश ग्रँड येथे शुक्रवारी शिवसेना, वंजारी समाज, जयभगवान महासंघ व दैवत फाउंडेशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांंची बैठक झाली.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी वाकळे यांनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे यांच्याकडे दिलगीरीचे पत्र दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते,

युवा सेना प्रमुख विक्रम राठोड, संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, योगीराज गाडे, संजय शेंडगे, अभिषेक कळकर, गिरीष जाधव उपस्थित होते.

कोहिनूर मंगलकार्यालयात लहामगे यांना दिलेल्या धमकीमुळे वाद निर्माण झाला होता. संपर्क प्रमुख भाऊ कोरगावर यांनी गुरुवारी लहामगे यांना मुंबईला बोलावून घेत चर्चा केली.

त्यानंतर हा वाद सामोपचाराने मिटवण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक पदाधिकाऱयांना दिल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या चर्चेत या वादावर पडदा पडला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment