कोरोनाचा संकट टळून, विस्कळीत झालेले जीवन सुरळीत होण्याची जगदंबे चरणी प्रार्थना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- नवरात्रीच्या सातव्या माळी निमित्त बोल्हेगाव येथील आंबेडकर चौक, रेणुकानगरला भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बाळासाहेब वाघमारे, बाळासाहेब साठे, अलका वाघमारे, सुभाष वाघमारे, अजय वाघमारे, विशाल साठे, विकास वाघमारे, प्रकाश वाघमारे, माजी नगरसेवक किसन भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब वाघमारे म्हणाले की, आंबेडकर चौक रेणुकानगर येथे सालाबाद प्रमाणे नवरात्री उत्सवाच्या सातवा माळी निमित्त भाविकांसाठी भंडार्‍याचे आयोजन करण्यात येते.

या उपक्रमाचे हे 15 वे वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या भागातील सर्व नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. तर आई जगदंबे चरणी कोरोनाचा संकट टळूदे व नागरिकांवर जे आर्थिक संकट दूर होण्यासाठी विस्कळीत झालेले जीवन सुरळीत होण्याची प्रार्थना करण्यात आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment