खडसेंच्या जाण्याने भाजपाला फटका बसणार; भाजपचे शिवाजी कर्डीले म्हणतात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजपाला धक्का बसला आहे.

त्यांच्या जाण्याने काही फरक पडत नसल्याचे बोलले जात असले तरी पक्षाला नक्कीच याचा तोटा होईल असे पक्षांतर्गत गुप्तपणे चर्चाही ऐकायला मिळत आहे.

अशातच आता नाथाभाऊंचे कट्टर समर्थक आमदार शिवाजी कर्डिले यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंमुळे भाजपला काही प्रमाणात फटका बसणार असल्याचे कबूल केले आहे.

परंतु याबरोबरच त्यांनी इतरही गोष्टींचा उलगडा केला आहे. ते म्हणाले, भाजप हा मोठा पक्ष आहे. माझा कोणत्याही प्रकारचा खडसेंशी संपर्क नाही. मी आता भाजपातच आहे आणि अखेरपर्यंत भाजपातच राहणार आहे असेही ते म्हणाले .

कर्डिले – एकनाथ खडसे यांचे ‘असे’ कनेक्शन : – कर्डिले यांनी १० वर्षापूर्वी राष्ट्रवादीला सोडून खडसेमुळे भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपकडून ते दोनवेळा आमदार झाले.

२०१९ च्या निवडणूकीत नगर- राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला. कर्डिले हे खडसे यांचे समर्थक असल्यामुळे कर्डिले यांच्या भुमिकेबाबत उत्सुकता होती. मात्र, याला त्यांनी पूर्ण विराम दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment