हिवरे बाजार येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी वृक्षारोपण करून साजरे केले सीमोल्लंघन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- दिनांक २५ ऑक्टोबर २०२० रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आदर्शगाव हिवरे बाजार येथे डॉ.राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी वृक्षारोपण करून सीमोल्लंघन केले.

यावेळी त्यांनी विविध विकास कामाची पहाणी करून माहिती घेतली आणि आनंद व समाधान व्यक्त केले. हिवरे बाजार येथील विकासकामांची सुरवात हि रोजगार हमी योजनेतूनच झाली असून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना त्यात प्रामुख्याने गोठा कोक्रेट करणे,

वैयक्तिक शौचालय बांधणे,गांडूळ नॅडेप प्रकल्प उभारणी,फळबाग लागवड तसेच सामुदायिक योजनामध्ये पाणंद रस्ते, शिवार वाहतुकीचे रस्ते व अंतर्गत रस्ते व पाणलोट विकासाची कामे,वृक्षलागवड करण्यासाठी रोजगार हमी योजनेचा निधी व ग्रामपंचायतीचा पुढाकार यातून हिवरे बाजार मध्ये रोजगार हमी अंतर्गत झालेल्या

कामाची सविस्तर माहिती पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिली. श्री.जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले, गावांच्या विकासासाठी मिळणारा शाश्वत निधी हा रोजगार हमी योजनेच्या माध्यामातून मिळतो त्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार महत्वाचा आहे.त्यातून अहमदनगर जिल्ह्यात हिवरे बाजार प्रमाणे इतर गावे सुध्दा मॉडेल होऊ शकतात.

रोजगार हमी योजनेची कामे इतर गावामध्ये सुध्दा कशी राबविता येतील याबाबत लवकरच आराखडा तयार करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मा.श्री.पोपटराव पवार व ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांचे फेटा बांधून स्वागत केले.यावेळी समवेत श्रीनिवास अर्जुन-उपविभागीय अधिकारी अहमदनगर,

गहिनीनाथ कापसे उपविभागीय कृषी अधिकारी ज्योती देवरे -तहसीलदार पारनेर,अमोल निकम तहसीलदार संगमनेर, पोपटराव नवले तालुका कृषि अधिकारी, तसेच इतर अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment