Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtra

दहशत कायम! बिबट्याच्या हल्ल्यात गाय गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतीच संगमनेर तालुक्यातील मांडवे बु येथे दोन बिबट्याने एका शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला करत गंभीररीत्या जखमी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, तालुक्यातील मांडवे बु येथील शेतकरी त्रिंबक रामभाऊ लोहटे यांनी जवळील शेतात गाय चरण्यासाठी उसाच्या शेतावरील बांधावर बांधली होती.

तर त्रिंबक लोहटे यांच्या पत्नी राधाबाई त्रिंबक लोहटे ऊस खुरपत होते. मात्र अचानक दबा धरून बसलेले दोन बिबट्यांने बांधावर चरत असलेल्या गाईवर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात बिबट्याने गायीला गंभीर रित्या जखमी केले आहे.

बिबट्याच्या या हल्यात गाय मरण अवस्थेत आहे. साकुर परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले सुरूच आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या अगोदरही बिबट्याने हल्ले केले आहे. बिबट्याच्या वारंवार होत असलेल्या हल्याने परिसरात घबराट निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button