अहमदनगरच्या युवतीची स्वादक्षेत्रात चवदार झेप! करोनाकाळात छंदातून व्यावसायिक भरारी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-करोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन काळ अनेकांसाठी आपत्ती ठरला असला तरी अनेकांसाठी इष्टापत्तीही ठरला आहे. मूळच्या नगरच्या व एमबीएचे शिक्षण झाल्यानंतर पुण्यात जॉब करणार्‍या प्रियंका राजेंद्र बोरुडे यांच्यासाठी करोनाकाळ त्यांच्या छंदाचे एका उत्तम व्यवसायात रुपांतर करणारा ठरला.

लहानपणासूनच चांगले चांगले चमचमीत पदार्थ तयार करून ते अतिशय प्रेमाने घरातल्या मंडळींना खिलवण्याची आवड असलेल्या प्रियंका यांनी नगरमध्ये सरस्वती फूडस हा व्यवसाय सुरु करून अल्पावधीतच खवय्यांची मनं जिंकून रसनातृप्तीचा आनंद दिला आहे. करोनाकाळात हॉटेलिंगपासून दुरावलेल्या खवय्यांना सरस्वती फूडची अस्सल आपलुकीच्या स्वादाची सेवा अक्षरश: पर्वणी ठरली. सरस्वती फूडची मास वडी, उंबर हंडीची व्हेज थाळी तसेच मटण, चिकनची नॉन व्हेज थाळी खूप लोकप्रिय झाली असून सरस्वती फूडसकडे ऑर्डरचा ओघ वाढला आहे.

पार्श्वभूमी :- प्रियंका बोरुडे यांना अगदी लहान वयातच उत्तम स्वयंपाकाची व चांगले चांगले पदार्थ स्वत: तयार करून खिलवण्याची आवड होती. भविष्यात हॉटेल मॅनेजमेंटचं रितसर शिक्षण घेवून याच क्षेत्रात करियर करण्याचेही त्यांनी ठरवलं होतं. पण काही कारणांनी त्यांना ते शक्य झालं नाही व त्यांनी एमबीए केलं व पुण्यातील चांगल्या कंपनीत नोकरीही मिळवली. मात्र ही नोकरी करीत असतानाही त्यांच्यातील पाककौशल्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. त्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करून कंपनीतील सहकारी, नातेवाईक, आप्तजनांना खिलवायच्या. त्यांच्या हाताला असलेली अन्नपूर्णेची चव प्रत्येकाच्याच पसंतीस उतरायची. त्यामुळे जुलै 2018 मध्ये त्यांनी पुण्यात ऑनलाईन फूड उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.

त्याला मोठा प्रतिसाद मिळत असताना करोनाचे संकट आलं व त्यांना नगरला येवून वर्क फ्रॉम होम करावे लागलं. या काळात बराच वेळ मिळाल्यानं त्यांनी आपल्या छंदाचा नगरकर खवय्यांनाही आस्वाद मिळवून द्यायचा असे ठरवून जुलै 2020 मध्ये ‘सरस्वती फूडस’ची मुहूर्तमेढ रोवली. या कामी त्यांना भाऊ अभिजीत बोरुडे तसेच आई वडील व आजीची साथ मिळाली. घरातून मिळालेले पाठबळ आणि त्यांच्यात असलेला सुगरणपणा यामुळे अल्पावधीतच सरस्वती फूडसकडे ऑनलाईन ऑर्डर येवू लागल्या. एकदा त्यांच्या हातच्या पदार्थांची चव चाखलेले ग्राहक वारंवार नवनवीन पदार्थांच्या ऑर्डर देवू लागले.

एकाहून एक सरस मेन्यू :- सरस्वती फूडची स्थापना करताना प्रियंका यांनी क्वालिटी, क्वांटीटी व हायजिन याबाबतीत कोणतीही तडजोड न करण्याचे सूत्र अवलंबले आहे. आपल्याला स्वत:ला जसे खायला आवडेल तसेच ते इतरांनाही दिले पाहिजे असा त्यांचा दंडक आहे. सरस्वती फूडसव्दारे व्हेज नॉनव्हेजचा मेन्यू घरपोच दिला जातो. व्हेजमध्ये चार व्यक्तींच्या कुटुंबाला पुरेल आणि तितकीच रुचेल अशी उंबर हंडी/ मास वडी थाळी खवय्यांसाठी रसनातृप्तीचा आनंद देणारी आहे. या थाळीत काळ्या मसाल्याच्या झणझणीत रस्सा, वांग्याचे भरीत, भात, भाकरी, ठेचा असा अस्सल गावरान मेन्यू असतो. नॉनव्हेजमध्ये मटण, चिकन थाळीचे स्वतंत्र पॅकेज आहे.

या थाळीतही चिकण, मटणाच्या जोडीला सूप, भात, भाकरी, ठेचा असा मेन्यू असतो. व्हेज, नॉनव्हेज दोन्ही थाळींमध्ये भरपूर क्वांटीटी क्वालिटीसह देण्यात येते. नॉनव्हेजमध्ये सरस्वती फूडसच्या स्पेशल ‘चिकन घी रोस्ट’ला मोठी मागणी आहे. याशिवाय चिकन खर्डा फ्रायही खवय्यांना उत्तम खाण्याचा आस्वाद मिळवून देतो. बिर्याणीने तर बहार निर्माण केलेली आहे. दसर्‍यानंतर सरस्वती फूडस खास खवय्यांच्या आग्रहास्तवर सी फूड (मासे) सुरु करणार आहे. सरस्वती फूडच्या मेन्यूमध्ये ‘काश्मिरी रेशम कबाब’तर थेट काश्मिरच्या स्वादाची अनुभूती देतो. याशिवाय चिकन कॅफ्रियल, बटर चिकन, चिकन तडका, चिकन दम बिर्याणी म्हणजे जेवणाचा पुरेपुर आनंदच ठरतो.

ही’ खासियत दुसरीकडे कुठेच नाही..:-  हॉटेलचे चमचमीत जेवण कितीही आवडत असले तरी हॉटेलमध्ये जेवल्यानंतर पोट जरा गच्च होते. ऍसिडीटी झाल्याची तक्रार अनेक जण करतात. या गोष्टीकडे सरस्वती फूडसने विशेष लक्ष दिलं आहे. त्यामुळंच सरस्वती फूडसमध्ये शुध्द गावरान तुपाचाच वापर करण्यात येतो. घरी तयार केलेले मसाले जेवण रूचकर बनवतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरस्वती फूडच्या पदार्थांना घरच्या गृहिणीची, आईच्या प्रेमळ हाताची चव असते. हॉटेलमध्ये बहुतांश पुरुष मंडळी स्वयंपाक करतात. त्यात व्यावसायिकता जास्त असते. एवढंच नाही तर स्वयंपाकासाठी भांडी वापरतानाही काळजी घेतली जाते. आपल्याकडे लोखंडी कढई, लोखंडी तवा वापरुन स्वयंपाक करण्याची प्रथा आहे. सध्या नॉनस्टिकचा जमाना असला तरी त्यात कुठेतरी कृत्रिमपणा असतो. सरस्वती फूडसमध्ये अशा पारंपरिक भांड्यांचा वापर केला जातो. काही पदार्थांसाठी मातीचे भांडे वापरुन पदार्थाला नैसर्गिक चव आणली जाते. येथे व्हेज नॉनव्हेज जेवण मिळत असले तरी दोन्हींचा स्वयंपाक, भांडी पूर्ण स्वतंत्र असतात. इतकी बारीक काळजी सरस्वती फूडस घेत आहे. त्यामुळंच इथला मेन्यू ग्राहकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.

सेफ डिलिव्हरी… :- करोना काळात बाहेरुन येणारी वस्तू असो कि खाद्यपदार्थ मनात एक शंकाच असते. ही गोष्ट ओळखून सरस्वती फूडस सॅनिटायझेशन, हायजिनची पूर्ण काळजी घेवून होम डिलिव्हरी करते. नगर शहरात सावेडी, एमआयडीसी, केडगाव, व्हिआरडीई, भिंगार, सारसनगर, बुर्‍हाणनगर असा सर्वदूर सरस्वती फूडचा स्वाद दरवळत असतो. नगर शहरात तर डिलिव्हरी पूर्ण फ्री दिली जाते. विशेष म्हणजे डिलीव्हरी पोहोच करण्याचे काम बोरूडे यांच्या कुटुंबातीलच सदस्य करतात. बाहेरील एजन्सीची मदत घेतली जात नाही. या स्वादाचा दरवळ इतका पसरला आहे की नेवासा, सोनई, शनशिंगणापूर आदी गावातील ग्राहक नगरमध्ये कामानिमित्त आल्यावर सरस्वती फूडसकडून ऑर्डर नोंदवून पार्सल घेवून जातात.

भविष्यातील वाटचाल :- मुळात छंदातून व्यवसायाची उभारणी केल्याने प्रियंका बोरुडे यांच्यासाठी चांगले पदार्थ ग्राहकांना देणे ही पॅशन आहे. करोना ओसरल्यानंतर स्वत:च आदर्श हॉटेल सुरु करून या व्यवसायाचा विस्तार करीत अधिकाधिक लोकांना रसनातृप्तीचा आनंद देण्याचा त्यांचा मनोदय आहे. सध्या मिळणारा प्रतिसाद पाहता याच क्षेत्रात करियर करण्याचेही त्यांचे नियोजन आहे.

सरस्वती फूडस – : पत्ता : ‘सरस्वती’, ओंकार ट्रेडर्स समोर, सेंट थॉमस चर्च जवळ, लिंक रोड, केडगाव, अहमदनगर ऑर्डरसाठी संपर्क : 9623374116, 8014212121

अहमदनगर ब्रॅंडिंगच्या वतीने सरस्वती फूड्सचे हार्दिक अभिनंदन आणि जिद्दीला सलाम! पुढील चवदार प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment