ऊसतोड मजुरांसाठी प्रकाश आंबेडकरांनी केली हि महत्वपूर्ण मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- सध्या ऊसतोड कामगारांनी काही प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या मागण्यांसंदर्भात येत्या दोन दिवसात राष्टवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थिती बैठक आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान ऊसतोड कामगारांच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक मागणी केली आहे. याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले कि,

वारंवार ऊसतोडणी कामगार, मुकादम आणि वाहतुकदारांच्या दरवाढीचा प्रश्न निर्माण होतो. विधानसभेत यासंदर्भात कायदा निर्माण होणे गरजेचे आहे.

ऊसतोड मजुरांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत कायदा करून माथाडी कामगारांच्या बोर्डाप्रमाणे नवीन बोर्डाची स्थापना करावी,

अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली. श्रीक्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या खरवंडी कासार येथे आज ऊसतोडणी कामगार,

मुकादम व वाहतुकदारांच्या मेळाव्यात ऍड. आंबेडकर बोलत होते. धनराज वंजारी, युवराज बांगर, अनिल डोंगरे, प्रतिक बारसे, दादा खेडकर आदी उपस्थित होते.

साखर कारखानदार, संचालक मंडळाचे राजकारण कारखानदारीवर चालते. त्यांना ऊसतोडणी मजूर, मुकादम आणि वाहतुकदारांची गरज आहे.

त्यामुळे कारखान्यांवर जाण्याची घाई करू नका. अजून दहा दिवस संप लावून धरा, असे आवाहन देखील आंबेडकरांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment