ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

ऊसतोडणी कामगारांच्या संपाबाबत पवार साहेब काय भूमिका घेणार; दोन दिवसात कळणार

0

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दराचा करार संपल्याने नव्याने करार करुन दरात साधारण दुप्पट वाढ करण्यात यावी अशी मागणी करत ऊसतोडणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे.

ऊसाचे क्षेत्र यंदा अधिक असल्याने कारखान्याचा गाळप हंगाम लांबण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. संप सुरु असल्याने अनेक कारखाने सुरु झाले नाहीत आणि चाररूबैठका होऊनही संपावर तोडगा निघाला नाही.

Advertisement

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत होती. त्यानुसार ऊसतोडणी काढण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत (ता. 27) मांजरी (पुणे)

येथील वसंतदादा शुगर इस्टीट्युट येथे बैठकीचे आयोजन केले आहे. तसेच साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, मागील वेळी द्विसदस्यीय लवादच्या सदस्य माजीमंत्री पंकजा पालवे व मंत्री जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे,

Advertisement

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्यातील सात ऊसतोडणी कामगार संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला हजर असतील.

संपाबाबत पवार यांच्या मध्यस्थीने काय निर्णय होणार, मजुरांना किती दरवाढ मिळणार याकडे कामगारांसह साखर कारखानदारांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li