अल्पवयीन मुलीचे अपहरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यातच सध्या अल्पवयीन मुलींच्या छेड छाडीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. दरम्यान एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना जिल्हात घडली आहे.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात तीन जणांवर अपहरण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, देवळाली प्रवरा येथील ११ वीत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी ही दिनांक २४ ऑक्टोबर रोजी देवळाली प्रवरा येथील आठवडे बाजार असल्याने भाजीपाला आणण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. र

स्त्यात आरोपी अनिता पारखे ही सदर मुलीला भेटली. पाच मिनिटांकरिता घरी चल अशी म्हणाली. सदर मुलीने नकार दिल्यावर अनिता पारखे हिने तिला जबरदस्तीने तिच्या घरी नेले. थोडावेळ थांबल्यानंतर सदर मुलगी तेथून निघाली. यावेळी आरोपी विकास पारखे मुलीस म्हणाला कि तू गाडीवर बस तूला बाजारात सोडतो. असे म्हणत विकासने गुहा येथील सतिष गायकवाड या मित्राच्या घरी पीडित मुलीस घेऊन गेला.

आरोपी विकासने तिला जबरदस्तीने गाडीवर बसवून गाडी नगरच्या दिशेने चालवली. मला तूझ्या सोबत लग्न करायचे आहे. तू काही बोलू नको. असे म्हणून त्याच्या जवळील चाकू दाखवून दम दिला. तोपर्यंत ते नगर येथील झोपडी कॅन्टींग पर्यंत पोहचले. तेथे चाकूचा धाक दाखवून कोठे काही बोललीस तर तूला ठार मारीन असा दम दिला. आणि सदर मुलीला तिथेच सोडून तो निघून गेला. यावेळी पिडीत मुलीला तिच्या घरच्या लोकांचा फोन आला.

आणि पिडीत मुलीने घडलेला प्रकार सांगितला. नंतर तिच्या चुलत भावाने तिला नगर येथून घरी घेऊन गेला. याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत विकास सुनिल पारखे, अनिता सुनिल पारखे व आकाश सुनिल पारखे या तिघांविरुद्ध अपहरण व विनयभंग अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय पठारे हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment