अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया व पारनेरचे नगरसेवक सय्यद यांच्या पुढाकाराने वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींनां 1 लाख रुपयाच्या कोरोना पॉलीसीचे वाटप

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-आमचा एक सहकारी पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने निधन झाले, त्यांना उपचार वेळेवर मिळाले नाही आणी म्हणून मीडियाचे काम करतांना 100% सेवाभाव म्हणजे ज्या गोष्टी कधी समाजापुढे आल्या नाही अश्या गोष्टीनां समाजापुढे आणण्याचा काम वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी करत असतात आणी म्हणून त्यांना स्वतःला एक कवच पाहिजे त्यामुळे आज करण्यात आलेल्या कोरोना पॉलीसीच वाटप हा कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नगर पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.

अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन व पारनेर येथील शिवसेनेचे नगरसेवक मूद्द्सर सय्यद यांच्या पुढाकाराने अहमदनगर शहरातील वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना आमदार निलेश लंके यांच्या हस्ते कोरोना पॉलीसीचे वाटप करण्यात आले आहे,

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार निलेश लंके, शिवसेना नगरसेवक मूद्द्सर सय्यद व सर्व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील मीडिया असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आलेल्या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात आपल्या जीवावर उदार होऊन प्रत्येक बातमी जनमानसापर्यंत पोहचवीण्यासाठी अहमदनगर जील्ह्यसह महाराष्ट्रातील माध्यमकर्मी बातमीदारी करत होते, दरम्यान त्या काळात देखील अनेक माध्यम प्रतिनिधींनां कोरोना झाला होता ! कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊन प्रक्रियेनंतर आता अनलॉक सुरू झाला आहे,

अनलॉक सुरू झाला असला तरी अनलॉकमुळे वाढती गर्दी, त्या गर्दीत जाऊन करावी लागणारी बातमीदारी, या सगळंयाचा वीचार करून अहमदनगर शहरातील वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन व नगरसेवक मूद्द्सर सय्यद यांच्या पुढाकाराने कोरोना पॉलीसीचे वाटप करण्यात आले,

वाटप करण्यात आलेली कोरोना पॉलीसी हि 1 लाख रुपयाची असुन वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी हा कोरोना पॉजेटिव्ह आढळून आल्यास त्याला या पॉलीसीची मदत होणारं असल्याची माहिती अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे,

यावेळी प्रस्ताविक मीडिया असोसिएशनचे सचिव लैलेश बारगजे यांनी केलें तर आभार उपाध्यक्ष कुणाल जायकर यांनी मानले, या कार्यक्रमाप्रसंगी नगर पारनेरचे आमदार निलेश लंके, पारनेरचे नगरसेवक मूद्दसर सय्यद,

अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष उमेर सय्यद, उपाध्यक्ष कुणाल जायकर, सचिव लैलेश बारगजे, सहसचिव रोहित वाळके, खजिनदार निखिल चौकर, सुशील थोरात, सागर दूस्सल, संजयकूमार पाठक यांच्यासह माध्यम प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved