अहमदनगरच्या केमिस्ट्ची पंतप्रधानांकडे ‘ही’ मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- सध्या देशभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्वांचे लक्ष कोरोनाच्या लशीकडे लागलेले आहे. पुढील वर्षाच्या सुरवातीस कोरोना लस येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आता खरे आवाहन ती लस व्यवस्थित सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने (एआयओसीडी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन दिले असून

यात कोरोनाची लस वितरित करण्यासाठी देशभरातील केमिस्टांच्या शृंखलेचा उपयोग करावा अशी मागणी केली आहे अशी माहिती जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष चेतनकुमार कर्डिले,

जिल्हा सचिव राजेंद्र बलदोटा व कोषाध्यक्ष संजय वाव्हळ यांनी दिली. ‘एआयओसीडी’चे अध्यक्ष जे. एस. शिंदे यांनी पंतप्रधानांशी झालेल्या ऑनलाईन बैठकीत आश्वासन दिले होते, की देश कोविडमुळे आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे.

‘एआयओसीडी’ संस्थेच्या माध्यमातून 8 लाख 50 हजार सभासदांची मोठी साखळी आहे. संस्थेचे सक्रीय सदस्य कोणत्याही अडथळ्यांविना पूर्ण देशात औषधे उपलब्ध करून देतील.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!