आमदार निलेश लंके म्हणाले तालुक्याचे १८ कोटी वाचले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून कोणताही स्वार्थ न पाहता समाजासाठी झोकून दिले. प्रत्येक जण माझाच आहे या विचारातून मिळालेली ऊर्जा व त्यातून केलेले

२४ तास काम यातून मी मतदारसंघावर पकड निर्माण केली, हुजरेगिरी करून नव्हे ! असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी आपल्या यशाचे रहस्य गावकऱ्यांपुढे उलगडून दाखवले.

आमदार लंके यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हंगे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना, ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत राजकीय जीवनात मोलाची साथ देणाऱ्या हंगे गावाला ‘मॉडेल व्हिलेज’ करून दाखवेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार लंके म्हणाले, कर्जुलेहर्या येथील कोविड केअर सेंटरमधील सुविधांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कौतुक केले. ऑक्सिजन लेव्हल कमी झालेल्या रूग्णांना मारूती कारमधून पुढील उपचारासाठी हलवावे लागल्याचे समजल्यानंतर पवार यांनी तात्काळ अत्याधुनिक अ‍ॅब्युलन्स देण्याच्या सुचना दिल्या.

कोरोना काळात निःस्वार्थ भावनेतून केलेल्या कामास पवार साहेबांनी रूग्णवाहिकेच्या रूपाने पावती दिली तो देखील मोठा आनंद आहे. आजपर्यंत मी समाजासाठी खूप काम केले परंतू कोरोनाच्या काळात केलेल्या कामाइतके समाधान कोणत्याही कामात मिळाले नाही.

सामान्य जनतेचे लाखो रुपये खासगी दवाखान्यांमध्ये खर्च होऊ लागल्याने एक हजार बेडचे आरोग्य मंदीर सुरू केले. तेथून १ हजार ७५० रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यांनी खासगी रूग्णालयात उपचार घेतले असते तर अप्रत्यक्षरित्या तालुक्याचे किमान १८ कोटींचे नुकसान झाले असते. ते नुकसान वाचले यात मोठे समाधान आहे, असे आमदार लंके यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment