Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingMaharashtraPolitics

शिवसेना मदतीला धावून येणारी संघटना :  सातपुते

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- नगर शहरात शिवसेनेचे चांगले काम आहे.त्यामुळे नगरमध्ये शिवसेनेशी अनेकजण जोडले गेले आहेत. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारी संघटना म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते.

त्यामुळे शिवसेनेच्या सदस्य नोंदणीत नगर शहर शिवसेनेची जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी होईल. युवक, महिला व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न प्राधान्यांने सोडविण्यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे.

अशा संघटनेत सभासद होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्नशिल आहेत. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.

या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे. त्यासाठी जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी शहर पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावे.

स्व.अनिल राठोड यांचे नगर शहरासह जिल्ह्यात पक्ष वाढीत मोठे योगदान आहे. त्यांच्या प्रेरणेने हे कार्य यापुढेही असेच सुरु राहील,  असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button