Ahmednagar NewsAhmednagar North

‘आमच्या पक्षात सर्वांचा सन्मान’ ; मंत्री तनपुरे यांचा ‘त्यांना’ टोला

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजपाला धक्का बसला आहे. परंतु यावरुन दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.

नुकतेच प्रा. राम शिंदे यांनी खडसे यांना ज्येष्ठ नेते म्हणून भाजपमध्ये जी किंमत होती, ती कधीही राष्ट्रवादीत मिळणार नाही. आगामी काळात खडसे यांना राष्ट्रवादीत गेल्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही,’ असा घणाघात केला होता.

हाच धागा पकडत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले ‘एकनाथ खडसे यांना भाजपमध्येच खूप पश्चाताप झाला,

म्हणूनच ते आमच्याकडे आले, आमच्या पक्षात सर्वांचा योग्य तो सन्मान ठेवला जातो, हे त्यांना लवकरच कळेल, तसेच पाहिलं तर मी पक्षात छोटा कार्यकर्ता आहे. मात्र नगरमधील काहीजण संपर्कात आहेत. वेळ आल्यावर आपल्याला कळेल असाही गौप्य स्फोट तनपुरे यांनी केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button