‘ती’ भरती वादाच्या भोवऱ्यात ; १४ उमेदवार डमी ? सीसीटीव्ही फुटेजही मिळेना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टलकडून राबविण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या प्रकियेत डमी विद्यार्थी बसल्याचे आढळून आल्यावर खळबळ उडाली होती.

प्रशासनानेच भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करताना संशयास्पद बाबी समोर येत आहेत.

आता शासनाच्या महाआयटी विभागाकडून या उमेदवारांच्या परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसून घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता आहे. एमपीएससीने बंदी आणलेले काही उमेदवार गुणवत्ता यादीत आले आहेत.

नगरला आक्षेपार्ह आढळलेले १४ उमेदवार हे एकाच प्रवर्गाचे व एकाच जिल्ह्यातील आहेत. जुलै २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षामध्ये १४ उमेदवारांच्या प्रवेश अर्जातील व परीक्षागृहातील स्वाक्षरी आणि छायाचित्रात तफावत आढळून आली.

त्यामुळे या २३६ उमेदवारांच्या परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शासनाच्या महाआयटी विभागाकडे मागितले. मात्र ते उपलब्ध झालेले नाही.

भरतीचे काम पाहिलेल्या यूएसटी ग्लोबल या खासगी कंपनीने केवळ चौदा संशयित उमेदवारांचा अहवाल दिला आहे. त्यात पाच उमेदवारांचे फुटेजच आढळले नाही, ७ ऑक्टोबरला महाआयटी विभागाच्या संचालकांना पुन्हा पत्र पाठविले. मात्र ही माहिती अद्याप मिळालेली नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment