राज्याच्या राजधानीवर दहशतवादाचे संकट; कलम 144 लागू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- देशावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना अजून एक मोठे संकट देशाच्या आर्थिक राजधानीवर चालून आले आहे.

देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट शिजत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

गुप्तचर विभागाने याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाचं पत्र मिळताच मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला असून संपूर्ण शहरात ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.

दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं असून पुढील ३० दिवस हे आदेश लागू असणार आहेत,

असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. या गोष्टींवर बंदी येत्या 30 दिवसांत मुंबईवर ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, एरियल क्षेपणास्त्र किंवा पॅरा ग्लायडर्सद्वारे हल्ला होऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

त्यामुळेच मुंबईत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, एरियल क्षेपणास्त्र किंवा पॅरा ग्लायडर्सवर बंदी घालण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment