आता जनावरांना होतय या घातक आजाराची लागण

file photo

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- शेवगाव तालुक्यामध्ये जनावरांना अज्ञात रोगाची लागण होत असून, यामध्ये जनावरांना ताप येणे, अंगावर गाठी येणे , अस्वस्थ वाटणे यासारखी लक्षणे दिसून येत आहेत .

या प्राथमिक लक्षणांवरून हा लम्पी स्किन डिसीज(त्वचारोग )आहे असे पशुवैद्यक तज्ञांकडून सांगितले जात आहे. शेवगाव  तालुक्यासह पूर्व भागातील आंतरवाली , शिंगोरी, दिवटे, लाडजळगाव , मंगरूळ,

आदी गावांमध्ये वरील लक्षणे असलेली जनावरे आढळून येत आहेत. त्यांना सरकारी तसेच खाजगी पशुवैद्यकांकडून उपचार करुन घेतले जात आहेत.

सध्या जिल्ह्यात कोविड १९ विषाणू पाठोपाठ जनावरांमध्ये विषाणू संसर्गजन्य  या अज्ञात  आजाराचा संसर्ग होत असल्याने बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.

या रोगाची लागण  बाधित जनावरांच्या संपर्कात  इतर जनावरे आल्यास  होते.  या संसर्गजन्य  रोगग्रस्त जनावरांची संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नुकतेच सुरु झालेले जनावरांचे आठवडे बाजार ,साखर कारखान्यांचे सुरु झालेले गळीत हंगाम ,जनावरांची होणारी वाहतूक यामुळे या  रोगाचा प्रसार होत आहे.

देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरांमध्ये याचा प्रादुर्भाव लवकर दिसून येत असून यामुळे पशु पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाने या रोगाच्या निर्मूलनासाठी वेळीच जनजागृती करून बाधित जनावरे शोधून औषधोपचार केल्यास या रोगास रोखण्यास मदत होईल. याबाबतीत जनावरांना योग्य ते औषधोपचार व लसीकरण करण्यात यावे अशी मागणी पशु पालकांकडून होत आहे .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved