‘ह्या’ एकाच तालुक्यातून विमा कंपनीला जातोय 13 कोटीचा हप्ता ; परंतु अद्याप मदत मात्र शून्यच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- शेतकरी वर्ग हा जे काही कष्ट करतो ते सर्व निसर्गावर अवलंबून राहून करतो. परंतु बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीने मात्र त्यांचे प्रचंड नुकसान होत असते.

परंतु हे सर्व असले तरी यातून काही मदत मिळावी यासाठी तो नेहमीच विमा काढत असतो. परंतु ऐन वेळेस या कंपनीकडून मदत मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी त्रासला आहे.

राहाता या तालुक्यात 25 हजार शेतकर्‍यांकडून 13 कोटींचा पीक विमा हप्ता घेतला आहे. विमा योजनामध्ये शेतकरी हिस्स्याबरोबर राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकर्‍यांच्यावतीने विमा कंपनीला पीक विमा हप्ता भरते. 2020-21 वर्षाकरिता नगर जिल्ह्यासाठी सरकारने भारती अ‍ॅक्सा जनरल इशुरन्स पीक विमा कंपनी निश्चीत केली असून राहाता

तालुक्यातील जवळपास 24 हजार 947 शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. 17 हजार 556 हेक्टरवरील सोयाबीन, बाजरी, मका, कपाशी पिकासाठी शेतकरी हिस्सा म्हणून 1 कोटी 32 लाख 946 रुपयांचा पीक विमा हप्ता विमा कंपनीकडे जमा केला आहे.

शेतकर्‍यांच्यावतीने राज्य सरकारने यामध्ये 5 कोटी 83 लाख 58 हजार 145 रुपयांचा राज्य हिस्सा दिला असून केंद्र सरकारचाही यामध्ये शेतकर्‍यांच्यावतीने तेवढाच 5 कोटी 83 लाख 58 हजार 145 रुपयांचा पीक विम्याचा हिस्सा आहे. मात्र अद्याप पीकविमा कंपन्यांकडून परतावे देण्याबाबत कोणत्याच हालचाली होताना दिसत नाही.

दरम्यान, परतीच्या पावसाने अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 2 लाख 30 हजार शेतकर्‍यांचे 156 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे 1 लाख 64 हजार क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या

पंचनाम्यात जिल्ह्याच्या जिरायत भागातील 1 लाख 27 हजार शेतकर्‍यांचे 99 हजार 856 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यासाठी 67 कोटी 97 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.

बागायत भागातील 98 हजार शेतकर्‍यांचे 61 हजार 566 हेक्टरवरील 83 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. तर 2 हजार 735 हेक्टरवरील 3 हजार 881 शेतकर्‍यांचे सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment