बँक घोटाळा ! ठेवीदारांची तब्बल ८० लाखाची फसवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  आधीच देशभर कोरोनाने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला असल्याने अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. यातच बँक क्षेत्र देखील सावरताना दिसत आहे.

दरम्यान लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या देखील हाती पैशा शिल्ल्क राहिलेला नाही. यामुळे बँकेत ठेवलेला पैसा वापरण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय नाही.

मात्र एका बँकेकडून चक्क ठेवीदारांच्या रक्कमेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परळी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या देवळाली प्रवरा शाखेत ठेवीदारांचे तब्बल ८० लाख रुपये अडकले आहेत.

ठेवीदारांनी वारंवार मागणी करूनही ही पतसंस्था ठेवीदारांच्या ठेवी परत देत नसल्याने देवळाली प्रवरा येथील ठेवीदारांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचेसह राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख तसेच नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, परळी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या देवळाली प्रवरा शाखेत आम्ही ठेवी ठेवल्या आहेत. कित्येक दिवसांपासून ही शाखा बंद असून

ठेवी परत मिळण्यासाठी आम्ही पतसंस्थेच्या संबंधित अधिकारी यांना फोन करून आमच्या ठेवी परत मिळण्यासाठी विनंती करीत आहोत.

परंतू आम्हाला आमच्या ठेवी परत मिळाल्या नाहीत. सदर पतसंस्था बंद असल्याने आमची फसवणूक झाली. या पतसंस्थेविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात एप्रिल 2020 मध्ये तक्रार दाखल केली होती.

मात्र आजवर कोणतीही चौकशी किंवा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने आज राहुरी पोलीस ठाण्यात दुबार तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या तक्रारीची सुद्धा राहुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही. तर ठेवीदार तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारतील. अशी भूमिका ठेवीदारांनी घेतली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment