IndiaMoney

खुशखबर! 10 लाखांचं विमा कवच मिळवा या ATM कार्डवर

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- सणासुदीच्या काळात जनधन खातं उघडणाऱ्या ग्राहकांना आकर्षक ऑफर देण्यात येत आहे. ATM कार्ड देणारी कंपनी म्हणजे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ने Rupay Festive Carnival ला सुरुवात केली आहे. यामध्ये कार्ड धारकांना विशेष सूट देण्यात येणार आहे.

भारतामध्ये कॅशलेस पेमेंटला चालना मिळावी म्हणून अशाप्रकारच्या ऑफर्स ग्राहकांना देण्यात येत आहेत. सध्या कोरोनामुळे कागदी नोटांचा वापर शक्य तेवढा टाळावा, असं आवाहन सरकारकडूनही करण्यात येत आहे. आजकाल डीजिटल पेमेंट करण्यावर तरुणाईचा भर असतो.

विमा विनामूल्य उपलब्ध होणार 10 लाख रुपयांचा विमा :- रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्डद्वारे (RuPay Select Credit Card) 10 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देण्यात आले आहे.

परदेशात कार्ड वापरण्यावर एटीएमवर 5 टक्के कॅशबॅक तर पीओएसवर 10 टक्के कॅशबॅक दिले जाते.

जगभरातील 700 हून अधिक लाउंज आणि भारतात 30 पेक्षा जास्त लाउंजसाठी विनामूल्य आणि घरगुती लाऊंज उपलब्ध आहेत.

RuPay कार्ड म्हणजे काय? :- रुपे हे इंग्रजीतील दोन शब्दांनी बनलेले आहे, रुपेज आणि पे. सध्या आपण वापरत असलेले व्हिसा किंवा मास्टर डेबिट कार्डची पेमेंट सिस्टम ही परदेशी आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button