एमआयडीसीमध्ये पाण्याचा ठणठणाट पाईपलाईन दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरळित करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- मुळा धरणावरुन एमआयडीसी उद्योजकांना होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असून, उद्योजकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच कामगारांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पिण्याचे पाणी नसल्यामुळे कंपन्यांना टॅकरने पाणी आणावे लागते.

त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रशन निर्माण होतो. गेल्या १५ दिवसांपासून एमआयडीसीमध्ये थेंब भरही पाणीपुरवठा झालेला नसल्यामुळे सर्वांनाच विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यासाठी लवकरात लवकर मुळा धरणावरून येणारी पाईपलाईनची दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरळित करावा, अशी मागणी एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नागोजीराव राठोड यांच्याकडे स्वराज्य कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष योगेश गलांडे, सचिव आकाश दंडवते, सुनिल देवकुळे, सचिन कांडेकर, स्वप्निल खराडे आदी उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नागोजीराव राठोड यांनी शिष्टमंडळास सांगितले की, मुळा धरणावरुन एमआयडीसीला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या योजनेला सुमारे ४0 वर्षे झाले असून गेल्या १५ दिवसांपासून ठिकठिकाणी वारंवार पाणी योजनेचे पाईप फुटले जात आहेत. त्यामुळे एमआयडीसीमध्ये थेंबभर पाणी शिल्लक नाही.

पाणीपुरवठा विभाग हा रात्रंदिवस लिकेज काढण्याचे काम करत असून, ही योजना जुनी असल्यामुळे एका ठिकाणचे लिकेज काढल्यानंतर पाणीपुरवटा सुरळित होईपर्यंत दुसऱ्या ठिकाणी लिकेज निर्माण होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग अक्षरश: हतबल झाला आहे. टॅकर भरण्यासाठी सुद्धा एक थेंब पाणी शिल्लक नाही. तसेच आपल्या संरक्षण विभागाला एमआयडीसी पाईपलाईनवरूनच पाणीपुरवठा केला जातो. त्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल सुरु आहे.

तरी लवकरात लवकर होणारे लिकेजची दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरळित करु. नवीन योजनेला शासनाने मंजुरी दिलेले असून त्याचा निधीही वर्ग झालेला आहे. ठिकठिकाणी पाईप ही येऊन पडले आहेत. परंतु लाईन टाकण्यामध्ये विविध अडचणी निर्माण होत असल्यामुळे नवीन पाणी योजनेच्या कामाला गती मिळत नाही. यासाठी शासनाकडे आमचा पाठपुरावा सुरु आहे.

मुळा धरणावरून येणारी पाईपलाईनची दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरळित करावा, अशी मागणी एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नागोजीराव राठोड यांच्याकडे स्वराज्य कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी अध्यक्ष योगेश गलांडे, सचिव आकाश दंडवते, सुनिल देवकुळे, सचिन कांडेकर, स्वप्निल खराडे आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment