अमेरिकेतील ‘तो’ पाऊस पाहून आमदार रोहित पवार म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-   जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल.

२०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांचे फ्लोरिडातील भाषण सध्या सोशल मीडियावर चांगेलच चर्चेत आहे.

फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. यामुळे अनेकांना शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेची आठवण झाली.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान मागील वर्षी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकीय आखाड्यात सर्वांनाच थक्क करुन सोडलं होतं. निमित्त होतं ते म्हणजे साताऱ्यातील एका सभेचं.

पवारांची भर पावसातील ती सभा आजही लोकांच्या मनात घर करून बसली आहे. सर्वत्र चर्चा पवारांच्या त्याच सभेची झाली होती. त्यांच्या याच सभेची पुनरावृत्ती अमेरिकेत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment