बिबट्याने उडविली या तालुक्यातील नागरिकांची झोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी शहररासह अकोला भागात मंगळवारी दुपारनंतर  व रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याच्या बातमीने तालुका भितीच्या सावटाखाली गेला आहे.

शहरातील पहाटे व्यायामासाठी जाणारे लोक आता घराच्या बाहेर पडत नाहीत. शेतकरी एकटा शेतामधे जायला घाबरत आहे. रात्रभर शेतकरी फटाके वाजवुन हैराण झाले आहे.

बिबट्याच्या धास्तीने शेतकरीवर्ग घाबरला आहे. वनविभागाने सुचना देवुन नागरीकांना  व शेतकऱ्यांना सजग केले आहे.  पाथर्डी शहरातील (दुलेचांदगाव रस्त्याला ) अनिल सोनटक्के व जयश्री सोनटक्के हे शेतात चार वाजण्याच्या सुमारास शेतीचे काम करीत होते. त्यांच्या तुरीच्या शेतामधे बिबट्या झोपलेला दिसला. ते घाबरले व घराकडे पळाले.

वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले. ते सहा वाजता घटनास्थळी आले व त्यांनी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. अकोला येथील वस्तीवर राहणारे नारायण धायतडक, रामनाथ खाडे, महादेव खाडे, सुशिला बडे यांच्या वस्तीवर मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या आला होता.

त्यांनी फटाके वाजुन त्याला पळवुन लावले. तो उसाच्या शेतामधे गेला. ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मिडीयातुन पसरली. त्यामुळे अकोला, पालवेवाडी, दातीरवाडी, धायतडकवाडी, मोहोज देवढे , रुपनरवाडी, हाकेवाडी, काळेवाडी परीसरात शेतकऱ्यांमधे भितीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी वाड्या वस्त्यावर राहणारे नागरीक चांगलेच धास्तावले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment